चंद्रकांत पाटलांच्या ठाकरे साद – प्रतिसादावर अजित पवारांचा टोला
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना थेट भाजपसोबतच या असे आवाहन केलं त्यामुळे सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी, भाजपसह चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन एक दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र यावं. यासाठी आपण प्रय्तन करण्यासाठी तयार असल्याचे म्हटलं होत. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट भाजपसोबतच या असे आवाहन केलं त्यामुळे सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी, भाजपसह चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
यावेळी, चंद्रकांत पाटलांनी कोणाला साद घालावी आणि कुणाला घालू नये हे ज्यांनी त्यांनी ठरवावं असं म्हटलं आहे. तर चंद्रकांत पाटलांनी घातलेल्या सादवर प्रतिसाद मिळतोय, नाही मिळतोय याचं उत्तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना विचारणं योग्य ठरेल असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी म्हणावे रात गई बात गई म्हणत विचार करावा. आम्ही त्यांना बरोबर घेऊ. देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहे ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणारे नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांनी म्हटलं होतं.