Jejuri खंडेरायाच्या जेजुरीत मुसळधार पाऊस, गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप
खंडेरायाच्या जेजुरीत मुसळधार पाऊस, गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप
पुणे: खंडेरायाच्या जेजुरीत गड परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसाच्या पाण्याने जेजुरी गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.. काल रात्री सुमारे 1 तासभर मुसळधार पाऊस झाल्याने गडावरील पायऱ्यांवरील पाणी खाली येत होतं. सदरचा व्हिडीओ हा गडाच्या पायरी मार्गावरील आहे. पाण्याचा वेग मोठा असल्याने धबधबा वाहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती..