सुप्रियाताई, पवारसाहेबांचं तत्व तुम्ही पाळायला हवं, एवढा पुरोगामीपणा बरा नव्हे; कुणाचा टोला?
Anand Dave on Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले आहेत. मटण खावून मंदिरात जात देवदर्शन केल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंच्या देवदर्शनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आनंद दवे यांनीही सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
पुणे : हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. सुप्रियाताईंनी शरद पवारसाहेबांकडून हिंदू धर्म शिकून घ्यावा. मंदिरात जाण्याआधी मांसाहार करू नये. किंवा मांसाहार करून मंदिरात जाऊ नये. शरद पवारसाहेबांनी पाळलेली ही तत्वे सुप्रियाताईंनी सुद्धा पाळायला हवी होती. इतका पुरोगामीपणा निदान जाहीरपणे तरी बरा नव्हे, सुप्रियाताई!, असं आनंद दवे म्हणाले आहेत. शिवसेनचे नेते विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले आहेत. मटण खावून मंदिरात जात देवदर्शन केल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. त्यावरून आनंद दवे यांनीही सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
Published on: Mar 05, 2023 11:11 AM