अपघातांची मालिका थांबेना! 24 तासातला तिसरा अपघात, जेजुरी महामार्गावर ट्रक उलटला, एक ठार

| Updated on: May 05, 2022 | 9:26 AM

सध्या जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पुणे : पुण्यातील जुन्नरमध्ये भीषण (Junnar Accident) अपघात झाला. भरधाव वेगानं येणारा ट्रक उलटून अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झालाय. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. भरधाव वेगानं जाणारा ट्रक (Truck Accident) वळणावर असताना नियंत्रण सुटून पलटी झाला. या अपघातात किन्नरचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालकाची प्रकृती गंभीर आहे. सध्या चालकावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जुन्नर तालुक्याच्या कावळ पिंपरी येथे बेल्डे जेजुरी महामार्गावर हा अपघात झाला. गेल्या 24 तासांत झालेला हा तिसरा अपघात झाला. सांगली, नांदेडनंतर आता पुण्यात अपघात झाला आहे.

Special Report | Raj Thackeray यांच्या पहिल्या अटकेची कहाणी-tv9
Mumbai मधील मिनारा मशिदीत भोंग्याविना पार पडली पहाटेची अजान