कसबा पोटनिवडणूक : चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत महायुतीची महत्वाची बैठक

| Updated on: Feb 12, 2023 | 3:45 PM

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. यात निवडणुकीतील रणनितीबाबत चर्चा होणार आहे. पाहा...

पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. महायुतीतील घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहतील. शिंदे गट,आरपीआय, शिवसंग्राम आणि रासपचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. फडके हौद चौकात बैठक होणार आहे. कसब्यात प्रचार यंत्रणा नेमकी कशी राबवायची? यावर बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच निवडणूक जिंकण्यासाठी कोणती रणनिती आखता येईल. याबाबत बैठकीत चर्चा होईल.

Published on: Feb 12, 2023 03:45 PM
शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर
आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे गटावर टीका, मतांसाठी दारोदारी कटोरा…