Video : कसबा पोटनिवडणुकीचा आज निकाल? विजयाचा गुलाल कोण उधळणार? राज्याचं लक्ष

| Updated on: Mar 02, 2023 | 7:50 AM

Maharashtra Assembly By Election 2023 Results : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यांत झालेल्या या लढतीत विजयी कोण होणार? हे पाहणं महत्वाचं असेल. पाहा व्हीडिओ...

पुणे : भाजपच्या नेत्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक होतेय. या निवडणुकीसाठी भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर मैदानात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होतेय. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे. कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून 20 फेऱ्या होणार आहेत. थोड्याच वेळात 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

Published on: Mar 02, 2023 07:50 AM
विजय तर आमचा ‘त्याच’ दिवशी झाला होता!; मतमोजणी आधी रविंद्र धंगेकर यांच्याकडून विश्वास व्यक्त
पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल? अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्या चुरस; निकालाकडे राज्याचं लक्ष