शिक्षणावरुन ट्रोल करणाऱ्यांना रवींद्र धंगेकर यांचं चोख उत्तर, म्हणाले की, माझी पीएचडी….
पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. आता पुणे लोकसभा निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या शिक्षणावरुन त्यांना समाजमाध्यमात ट्रोल केले जात आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्याचा 8 वी पास अशिक्षित उमेदवार असे पोस्टर्स व्हायरल होत आहे.
पुणे लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना समाजमाध्यमावर त्यांच्या शिक्षणावरुन ट्रोल केले जात आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या ट्रोलिंगमुळे कॉंग्रेसचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर जराही विचलिच झालेले नाहीत. आपले शिक्षण काढण्याची वेळ विरोधकांवर आली म्हणजे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे. आपली जनतेशी नाळ कायम असून जनतेने पीएचडी दिली असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. रवींद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा पोट निवडणूक लढवून भाजपाच्या हेमंत रासने यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता. भाजपाचा बालेकिल्ला ढासळल्याने धंगेकर साल 2023 महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठे जायंट किलर ठरले होते. या निवडणूकीच धंगेकर लोकसभेला उभे राहीले आहेत. त्यांच्या समोर महायुतीचे भाजपचे नेते, माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे निवडणूकाला उभे राहीले आहेत. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ एखाद्याचे शिक्षण कमी असले म्हणून राजकारणात कोणी छोटे ठरत नाही. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेत क्रांती घडविल्याचे भुजबळ म्हणाले. गेल्या निवडणूकीवेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी धंगेकर हे साधे नगरसेवक आहे असे म्हणत ‘हु इज धंगेकर’ असा प्रश्न विचारला होता. त्याचा असा बुमरॅंग परिणाम झाला की धंगेकर निवडून आले. त्यामुळे नकारात्मक प्रचाराचा यावेळी धंगेकरांना फायदा होतो हे पाहावे लागेल…पाहा स्पेशल रिपोर्ट