‘ही’ दोन गावं पुणे महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय; काय आहे कारण?
उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोनं महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने हा निर्णय घेतला आहे.
पुणे : पुणे महापालिकेने दोन गावांना पालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोनं महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने हा निर्णय घेतलाय. फुरसुंगी आणि उरुळी देवाची याची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी 6 डिसेंबर 2022 ला निर्देश दिले होते. आता मुख्यसभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल. मात्र उरुळी देवाची कचरा डेपोची जागा मात्र महापालिका हद्दीत ठेवण्यात आली आहे. इतर जागा मनपा हद्दीतून वगळली आहे.
Published on: Feb 09, 2023 09:27 AM