Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो या तारखेपासुन सुरु होणार

| Updated on: Mar 02, 2024 | 1:46 PM

पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. या मार्गावर एकूण पाच स्थानके असून त्यामुळे पुणेकरांची ट्रॅफीक कोंडी आणि प्रदुषणातून सुटका होणार आहे.

पुणे | 2 मार्च 2024 : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गाच्या उद्घाटन येत्या 6 मार्चला उद्घाटन होण्याची शक्यता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. याआधी या प्रकल्पाचे उद्घाटन 19 फेब्रुवारीला होणार होते. परंतू दौरा लांबल्याने आता 6 मार्चला उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. पुणे मेट्रोचा विस्तारीत टप्पा गेल्यावर्षी 1 ऑगस्ट रोजी सुरु झाला. वनाझ ते रुबी हॉल असा 9.7 किमीचा मार्ग सुरु झाला होता. रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित 5.5 किमीच्या मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशा स्थानकांचा समावेश आहे.

Published on: Mar 02, 2024 01:43 PM
नमो महारोजगार मेळावा : सुप्रिया सुळेंनी दादांकडे न पाहता सर्वांची विचारपूस केली
Video | ठाण्याच्या जांभळीनाका येथे या तारखेला राहुल गांधी यांची न्याययात्रा प्रवेश करणार