खोटं बोलणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा

| Updated on: Apr 13, 2022 | 12:53 PM

भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुण्यात (Pune) आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून आज बालगंर्धव चौकात राष्ट्रवादी आंदोलन करत आहे. चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुण्यात (Pune) आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून आज बालगंर्धव चौकात राष्ट्रवादी आंदोलन करत आहे. चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरणी त्यांचा खोडेपणा उघड झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. पीडित तरुणीला खोटे बोलायला लावल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणीने आपली तक्रार मागे घेतली. तसेच चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटे बोलायला भाग पाडले, असे तरुणीने म्हटले होते. त्यानंतर चित्रा वाघ यांनीही स्पष्टीकरण देत आपण पीडितेची मदत केली ही चूक केली काय, असा सवालही केला होता. दरम्यान, पीडित तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधातील तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले आहे.

Published on: Apr 13, 2022 12:53 PM
वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय” – जितेंद्र आव्हाड
“राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय”; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका