मी माझ्या पत्नीला राज्याची पहिली मुख्यमंत्री करणारच; अभिजीत बिचुकले यांचा निर्धार

| Updated on: Apr 19, 2023 | 1:20 PM

Abhijit Bichukal on Maharahstra CM : अभिजीत बिचुकलेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहीलं आहे. कारण काय? पाहा व्हीडिओ...

पुणे : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांना मुख्यमंत्री करण्याचं बोलून दाखवलं आहे. शरद पवार यांनी स्वतःच्याच घरात सर्व पद ठेवली आहेत. 2024 मध्ये माझा पक्ष 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आणि 125 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार आहे. एक महिलेने पाडलं असं म्हणाले तेव्हाच अजित पवारांच्या मनात महिलांबद्दल किती सम्मान आहे ते दिसलं आहे. म्हणून मी माझ्या पत्नीला राज्याची पहिली मुख्यमंत्री करणार आहे, असं बिचुकले म्हणाले आहेत. अयोध्येत होणाऱ्या महाराष्ट भवनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावं, यासाठी अभिजीत बिचुकलेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहीलं आहे.

Published on: Apr 19, 2023 01:20 PM
जे मृत्यू झाले ते दुसऱ्या आजाराने; कोरोना मृत्यवर महाजन यांचे स्पष्टीकरण
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा शब्द डावलून गर्दी जमवली गेली; सुषमा अंधारे यांचा सरकारवर आरोप