अन् दादा संपर्क क्षेत्रात! नॉट रिचेबल अजित पवार थेट ‘या’ कार्यक्रमात दिसले

| Updated on: Apr 08, 2023 | 10:18 AM

Pune News Ajit Pawar : कालपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार अखेर अवतरले; पाहा व्हीडिओ...

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची चर्चा झाली. मागच्या 17 तासापासून अजित पवार नॉट रिचेबल होते. कालपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार आज पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोशोरूमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने समोर आले. पुण्यातील या कार्यक्रमाला त्यांनी सपत्नीक हजेरी लावली. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही यावेळी त्यांच्यासोबत होत्या. यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी शोरूममधील दागिने पाहिली. शिवाय या दागिन्यांची माहिती घेतली. त्यामुळे राज्यातील चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Published on: Apr 08, 2023 10:06 AM
कंबोज स्वत:च मोठे ड्रामेबाज, त्यांच्या नावात काय?; राखी सावंतचे टीकेला प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या अहंकारामुळेच राज्यही गेलं आणि पक्ष धुळीला मिळाला!; कुणाचं टीकास्त्र?