पवारसाहेब कधी खचले नाहीत, कधी शांत बसले नाहीत; अजित पवार यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

| Updated on: Apr 25, 2023 | 3:23 PM

अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता मेळावा; भाषणात सांगितल्या जुन्या आठवणी, पाहा व्हीडिओ...

बारामती, पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. बारामतीच्या राष्ट्रवादी कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार विविध विषयांवर बोलते झाले. शरद पवारसाहेब कधी खचले नाहीत. साहेब कधी शांत बसले नाहीत, असं अजित पवार म्हणालेत. काही महाभाग असे आहेत जे बारामतीचं नाव धुळीस मिळवण्याचं काम करत आहे. मी राजकीय कारकीर्दची सुरुवात 1987 मध्ये केली. बाजार समितीपासून मी सुरुवात केली. माल संपत नाही तोपर्यंत खरेदी केंद्र का बंद केली जातात, असं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून नेहमी सांगत असतो, असं अजित पवार म्हणालेत.

Published on: Apr 25, 2023 03:23 PM
‘या’ प्रकरणी संवादातून मार्ग काढवा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा; अजित पवार यांचं वक्तव्य
रात्री तमाशाला गौतमी पाटीलला बोलवा पण…, अजित पवार असं म्हणाले अन्…