कोकणातील सभेत राज ठाकरे काय बोलणार? अमित ठाकरे म्हणाले…
Pune News : मनसेचे नेते अमित ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित यांनी या दौऱ्यामागचं कारणही सांगितलं. पाहा व्हीडिओ...
पुणे : राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे शहर कार्यालयात दाखल झालेत.यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या दौऱ्यामागचं कारणही सांगितलं.”पक्षबांधणीसाठी आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर आलोय. आगामी महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे. महापालिका निवडणुका लागणार कधी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आम्ही तयारीत आहोत, असं अमित ठाकरे म्हणालेत. कोकणानंतर मी विदर्भाचा दौरा करणार आहे. राज ठाकरेंच्या कोकणातील सभेची मलाही उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे काय बोलणार हे माझ्यासाठीही सरप्राईज असतं, असंही अमित म्हणालेत.
Published on: Apr 27, 2023 01:27 PM