संजय राऊत यांची वक्तव्य, जागतिक व्यवस्था आणि समाधान; चंद्रकात पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
पुणे : भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवसी यांना पत्र लिहिलं आहे. तर देवेंद्रजी त्याला उत्तर देतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. संजय राऊत यांना फार सिरीयसली घेण्याची गरज नाही. आपण जागतिक अर्थव्यवस्थेत पुढे गेलो आहोत. संजय राऊत यांनी समाधान मिळत असेल तर माहिती नाही संजय राऊत यांच्याविषयी बोलून त्याचा जास्त बहुमान करण्याची गरज नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते.
Published on: Apr 04, 2023 11:48 AM