उद्धव ठाकरे यांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर; ‘तो’ व्हीडिओ दाखवत म्हणाले…

| Updated on: Apr 11, 2023 | 2:43 PM

Chandrakant Patil on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला चंद्रकांत पाटील यांनीही उत्तर दिलंय. पाहा...

पुणे : काहीवेळा आधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याला चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची व्हीडिओ क्लिप दाखवली आणि आपली बाजू मांडली. “बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर मी कधीही केला नाही. मी नेहमी मातोश्रीच्याजवळ राहिलो आहे. बाळासाहेब यांच्याबद्दल बोललोच नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास नेहमी केला जातोय. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांचा अनादर केला हा आरोप मी कधीही सहन करणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Published on: Apr 11, 2023 01:49 PM
चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या किंवा एकनाथ शिंदे तुम्ही राजीनामा द्या– उद्धव ठाकरे
धाराशिवमधील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्याकडून पाहणी; बळीराजा मदतीच्या प्रतिक्षेत