अजित पवार यांच्याविरोधात भाजप नेत्याची पुणे पोलिसात तक्रार; पाहा काय कारण?
Complaint against Ajit Pawar in Pune Police : अजित पवार यांच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल; काय कारण? पाहा सविस्तर बातमी...
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही मोजणी केली जात होती. सदर प्लॉटचा ताबा साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत आहे. म्हणून तक्रार दिल्याचा भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी दावा केला आहे.
Published on: Apr 12, 2023 11:38 AM