‘तो’ हक्कभंगाचा प्रस्ताव अन् संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होणार?; राहुल कुल म्हणाले…
MLA Rahul Kool on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होणार? राहुल कुल नेमकं काय म्हणाले? पाहा व्हीडिओ...
पुणे : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. त्यावर बोलताना राहुल कुल यांनी संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर भाष्य केलंय. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होणार का? अशी चर्चा होतेय. “संजय राऊतांनी आरोप माझ्याकडे हक्कभंग समिचीचं अध्यक्षपद आल्यानंतर सुरू केलेत. हक्कभंग समितीची पहिली बैठक झाली आहे. दुसरी बैठक अध्यक्षांच्या कार्यवाहीनुसार होईल, असं राहुल कुल यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणतात की मी कोणाला घाबरत नाही. तसं मीही अनेकांना घाबरत नाही, असंही राहुल कुल म्हणाले आहेत.
Published on: Apr 28, 2023 10:26 AM