पुणे जिल्ह्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; शिक्षणाचा खेळखंडोबा
Pune News : पुणे जिल्ह्यात बारा शाळा अनधिकृत असल्याचं उघड; विद्यार्थी अन् पालक धास्तावले. पाहा व्हीडिओ...
पुणे : पुणे जिल्ह्यात बोगस शाळांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. पुण्यात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. पुणे जिल्ह्यात बारा शाळा अनधिकृत आहेत. हवेली तालुक्यात सर्वाधिक चार शाळा अनधिकृत आहेत. तर दौंड, पुरंदर, खेड, मुळशी, हवेली या तालुक्यांमध्ये अनधिकृत शाळा आहेत. शिक्षण विभागाकडूनच अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे आहे. दौंड तालुक्यातील मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल, कासुर्डी येथील क्रेयांस प्री प्रायमरी स्कूल, बेटवाडी येथील के. के. इंटरनॅशनल स्कूल, हवेली तालुक्यातील किरकीटवाडी येथील कल्पवृक्ष इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हेवाडी येथील क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कूल, खडकवासला येथील किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल, लोणी काळभोर येथील पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, खेड तालुक्यातील भोसे येथील जयहिंद पब्लिक स्कूल, बावधन येथील एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, मुळशी तालुक्यातील जांभे येथील अंकुर इंग्लिश स्कूल, नेरे येथील साई बालाजी पब्लिक स्कूल, पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळा अनधिकृत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.