नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार; मंत्री दीपक केसरकर यांचा शब्द

| Updated on: Apr 10, 2023 | 10:14 AM

Deepak Kesarkar On Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान; मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. म्हणाले...

पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. “या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमचा विचार आहे. शेतकऱ्यांना नक्कीच सरकारकडून मदत दिली जाणार आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. तुम्ही सत्तेत असताना शेतकरी शेतकऱ्यांना काय मदत केली? अयोध्या दौऱ्यावरून फक्त राजकरण केलं जातं आहे. तसं होता कामा नये, असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Published on: Apr 10, 2023 10:10 AM
धुळ्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली; पांढऱ्या सोन्याचे भाव वाढले
अवकाळी पावसामुळे सोलापुरात शेतीचं नुकसान; दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट