पुण्यात 143 जागांसाठी निवडणूक, 321 जण रिंगणात; कोण बाजी मारणार? जिल्ह्याचं लक्ष

| Updated on: Apr 28, 2023 | 9:16 AM

Krishi Utpanna Bazar Samiti Election 2023 : पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या 143 जागांसाठी आज मतदान; पाहा संपूर्ण व्हीडिओ...

पुणे : पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या 143 जागांसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीसाठी 321 जण रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, मंचर, खेड, जुन्नर, नीरा या आठ बाजार समित्यांसाठी निवडणूक होतेय. 143 उमेदवारापैकी नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही तब्बल 20 वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच होत आहे. हवेलीसह अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढत होत आहे. बारामती येथील बाजार समितीचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बाजार समितीत संचालक मंडळाच्या एकूण प्रत्येकी 18 जागा आहेत. बारामतीत मात्र 17 जागा आहेत. तर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होणार मतदान होतंय. 18 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 4 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 31 मतदान 17 हजार 764 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडेल.

Published on: Apr 28, 2023 08:31 AM
मुख्यमंत्रीपदाची वक्तव्य करणं बालिशपणाचं; नाना पटोले यांची राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका
राहुल गांधी यांच्या याचिकेवर 29 एप्रिलला सुनावणी; सुरत कोर्टाच्या नकाराला आव्हान