येत्या निवडणुकीत संभाजीराजेंशी हात मिळवणी करण्यासाठी ‘हा’ पक्ष तयार?; पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 17, 2023 | 2:07 PM

Vidhansabha Election 2024 : आगामी निवडणुकीत हा पक्ष संभाजीराजेंसोबत येण्यास तयार?; पाहा व्हीडिओ...

पुणे : पुढच्या वर्षी देशात लोकसभा आणि राज्यात लोकसभेसह विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशात काही नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात. तसं संकेत रासपचे नेते महादेव जानकर यांनी दिलेत. पुण्यात मराठी उद्योजकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात छत्रपती संभाजीराजे आणि महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात महादेव जानकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Published on: Apr 17, 2023 02:07 PM
अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची ‘ही’ अट; पहा काय म्हणाले…
8 दिवस हॉस्टेलला पाणी नाही; बादली घेऊन जिल्हा परिषदेसमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन