पुण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक; ‘या’ कारणासाठी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीतील महत्वाचे मुद्दे. पाहा व्हीडिओ...
पुणे : पुण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची एकत्रित बैठक झाली. पुण्यात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेच्या नियोजनासाठी पुण्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. 14 मेला महाविकास आघाडीची पुण्यात वज्रमूठ सभा होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तिन्ही पक्षाची एकत्रित बैठक पार पडली.या बैठकीला तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष, आणि इतर नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांची देखील उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठसभेत उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या खुर्चीवरून विविध चर्चा झाली. त्यामुळे पुण्यातील सभेत स्टेजवर एकाच प्रकारच्या खुर्च्या ठेवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बैठकीत केली. तसंच स्टेजवरील बॅकग्राउंडवर तिन्ही पक्षाची चिन्हे असावी. कोणत्याही नेत्याचे फोटो नको, असाही प्रस्ताव मांडण्यात आला.