एसटी प्रवासात महिलांना 50 % सवलत देण्याच्या सरकारच्या निर्णयाला कसा प्रतिसाद? पाहा…

| Updated on: Apr 18, 2023 | 10:17 AM

Mahila Samman Yojana ST Bus : एसटी प्रवासात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पाहा व्हीडिओ...

पुणे : एसटीच्या प्रवास भाड्यात महिलांना सरसकट पन्नास टक्के सूट देणाऱ्या महिला सन्मान योजनेला एक महिना पूर्ण झालाय. एसटी प्रवासात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. राज्य सरकारकडून महिला सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. आता या योजनेला राज्यातील महिलांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात 4 कोटींच्या वर महिलांनी 50 टक्के प्रवास भाडे भरत प्रवास केल्याचं समोर आलं आहे. एका महिन्यात तब्बल 4 कोटी 22 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पुणे जिल्ह्यात महिलांची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. जिल्हयात एका महिन्यात 1 कोटींच्या वर महिलांनी महिला सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे.

Published on: Apr 18, 2023 10:09 AM
अजित पवार भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या ‘या’ ३ आमदारांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले…
पहाटेच्या शपथविधीला अजितदादा गेले होते तो पक्षाचा निर्णय होता; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट