पुण्यातील मार्केटयार्ड आज बंद; काय कारण?

| Updated on: Apr 20, 2023 | 1:11 PM

खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे पुण्यातील मार्केट यार्डात विविध संघटनाच्या वतीने करण्यात आली. तसंच मार्केटयार्ड आज बंदही ठेवण्यात येणार आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड आज बंद राहणार आहे. मार्केट यार्डमधील व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यातील बेकायदेशीर लिंबू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून माजी प्रशासक, अधिकारी,कर्मचारी आणि अडत्यांच्या विरोधात दाखल झालेला ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा रद्द व्हावा, या मागणीसाठी एक दिवस मार्केटयार्ड बंदची हाक देण्यात आली आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी सर्व संघटनांच्या वतीने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला देण्यात निवेदन देण्यात आलंय. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. बाजारातून लिंबू विक्रेते पूर्णपणे बंद केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर याप्रकरणी अधिकारी, अडते यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे मार्केट यार्डात विविध संघटनाच्या वतीने करण्यात आली. याच मागणीसाठी एक दिवस बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

Published on: Apr 20, 2023 01:08 PM
अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर विधानसभा अध्यक्षांनीही सोडलं मौन; पहा काय म्हणाले…
tv9 मराठी सलग नंबर वन!; लोकांच्या मनामनात स्थान असणारं मराठी न्यूज चॅनेल