Video : पुण्यात लसीकरण केंद्र बंद; काय कारण? पाहा…

| Updated on: Apr 06, 2023 | 12:07 PM

पुण्यात कोरोनावरील लस घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी जरूर वाचा... पुण्यात लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे.

पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील कोरोना लशीचा साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलं आहे. सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स लसींचा साठा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. कोव्हॅक्सिन लसीचे 800 ते 1000 डोस मुदतबाह्य झाले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये 1 एप्रिलपासून लस उपलब्ध झालेली नाही. पुढील लसीकरणासाठी पुणेकरांना किमान आठ दिवस वाट पहावी लागणार आहे. लशींचा पुरवठा झाल्यास लगेच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येतील, असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

Published on: Apr 06, 2023 12:07 PM
समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा मोदींवर विश्वास : देवेंद्र फडणवीस
मला दिवसातून फक्त एक वेळा पाणी मिळायचं; कारागृहातील अनुभव सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर