एनआयएने पुण्यात केलेल्या कारवाईवरून मुरलीधर मोहोळ यांची काँग्रेसवर टीका

| Updated on: Apr 20, 2023 | 11:48 AM

Muralidhar Mohol criticized Congress : भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : एनआयएने पुण्यात केलेल्या कारवाईवरून भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वाखाली दहशतवादी कारवायांना सतत आळा घालण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत.काँग्रेस सरकारचं असताना पुण्यात 2 वेळा बॉम्ब ब्लास्ट झाला होता. मोदी सरकार आल्यापासून आता नागरिकांना सुरक्षित वाटत आहे.पुणेच काय पण सर्व देशात सुरक्षिततेची भावना आहे, असं मोहोळ म्हणाले आहेत. दहशतवादी कृत्यासाठी वापर होत असल्याने पुण्यातील शाळेचे 2 मजले सिल करण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी करू नये. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, असंही मोहोळ यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 20, 2023 10:23 AM
खारघर श्रीसदस्य मृत्यूप्रकरण, सत्य आलं समोर; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब
सभेत घुसा आणि परत जाऊन दाखवा; संजय राऊत यांचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर