अजित पवार भाजपसोबत जाणार?; नाना पटोले म्हणाले, मी ‘या’ गोष्टीवर ठाम!

| Updated on: Apr 17, 2023 | 2:59 PM

Nana Patole on Ajit Pawar : अजित पवार भाजपसोबत जाणार का?; नाना पटोले यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. म्हणाले...

पुणे : मागच्या काही दिवसापासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरु आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार कुठेही जाणार नाहीत, हे मला माहिती आहे. मी ठाम आहे अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत. 2024 पर्यंत महाविकास आघाडी नक्की टिकेल, असं नाना पटोले म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणाले पंधरा दिवसात राजकीय भूकंप होतील ते कधीपासून भविष्यकार झाले?, असा सवालही नाना पटोले यांनी विचारला आहे. सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे अद्याप होत नाहीत, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

Published on: Apr 17, 2023 02:57 PM
त्यांना अडीत वर्षात असा कार्यक्रम करता न आल्याने या टीका, राऊत यांच्या टीकेला शिवसेना नेत्याचं प्रत्युत्तर
हे ईडीचं सरकार असंवेदनशील, त्यांना गांभीर्य नाही; सुप्रिया सुळे यांचा घणाघात