जगदीश मुळीक यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भावी खासदार म्हणून उल्लेख

| Updated on: Apr 10, 2023 | 2:47 PM

Prashant Jagtap Poster : आधी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोस्टर व्हायरल. पाहा व्हीडिओ...

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर पुण्यातील खासदारकीची जागा रिक्त झाली. या जागेसाठी कुणाला उमेदवारी देण्यात येणार याविषयी चर्चा होतेय. याआधी भावी खासदार असा उल्लेख करत भाजपचे नेते जगदीश मुळीक यांच्या नावाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाचा भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. प्रशांत जगताप यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये ‘पुण्यनगरीचे भावी खासदार प्रशांत जगताप’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक लागल्यास राष्ट्रवादी प्रशांत जगताप यांना उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

Published on: Apr 10, 2023 02:47 PM
अयोध्येला का गेले नाही? अब्दुल सत्तार नाराज? काय म्हणाले सत्तार?
अवकाळीचा फटका पिकाला अन् झालेल्या नुकसानानं शेतकऱ्याला अश्रू अनावर