‘दुचाकींचे शहर’ पुण्याची नवी ओळख; पुणेकरांकडे किती दुचाकी वाहनं?
Pune News : पुणे बनलं 'दुचाकींचे शहर'; मागच्या वर्षभरात किती दुचाकी विकल्या गेल्या? आकडेवारी नेमकं काय सांगते? जाणून घ्या...
पुणे : पुणे शहराला आता एक नवी ओळख मिळाली आहे. पुणे बनलंय ‘दुचाकींचे शहर’. पुणे शहरातील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षातही पुणेकरांचा कल दुचाकी खरेदीकडे जास्त दिसून आला. मागील आर्थिक वर्षात दुचाकी विक्री १ लाख ८५ हजार ६६६ आहे. याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात सुमारे ८५ हजारांनी वाढ झाली आहे. आरटीओ आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण वाहनांची विक्री १ लाख ७० हजार ५३७ होती. ती २०२२-२३ मध्ये २ लाख ९२ हजार २५९ वर पोहोचली आहे. मागील वर्षभरात वाहन विक्रीत सुमारे १ लाख २० हजारांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे ‘दुचाकींचे शहर’ अशी पुण्याची नवी ओळख निर्माण झाली आहे.
Published on: Apr 04, 2023 10:11 AM