पुरंदरमधील शेतकरी मेळाव्याला अजित पवार अनुउपस्थितीत; आयोजकांनी शरद पवार-सुप्रिया सुळे यांना बोलावलं…

| Updated on: Apr 17, 2023 | 2:20 PM

Ajit Pawar Absent in Purandar Shetkari Melava : पुण्यातील पुरंदरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला अजित पवार गैरहजर आहेत. पाहा व्हीडिओ...

पुरंदर, पुणे : पुण्यातील पुरंदरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. पण अजित पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं रद्द केलं. आज पुरंदरमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला अजित पवार अनुउपस्थितीत राहणार आहेत. अजित पवार शेतकरी मेळाव्याला येणार नसल्यामुळे आयोजकांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केलं. अजित पवारांचा पुरंदर तालुक्याचा दौरा आज नियोजित होता. मात्र अजित पवारांनी पुरंदर दौरा अचानक रद्द केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Apr 17, 2023 12:42 PM
वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय? काँग्रेस नेत्याचे सांगितलं कारण
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी ‘ही’ बाब प्रशासनाच्या लक्षात आली नाही का?; राज ठाकरेंचा सवाल