…तेव्हा अजित पवारांबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील; उदय सामंत यांचं वक्तव्य

| Updated on: Apr 20, 2023 | 3:35 PM

Uday Samant On Ajit Pawar : अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय. पाहा व्हीडिओ...

मुंबई : अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहेत. त्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय. अजित पवार युतीसोबत येणार ही चर्चा माध्यमांतूनच आम्ही ऐकली. तरीही अजित पवार आमच्यासोबत येणार असेल तर आम्ही विचारधारा स्विकारतील का? स्विकारणार असतील तर त्याचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील, असं उदय सामंत म्हणालेत. सध्या यावर अजित पवारांनी पूर्णविराम लावलाय. पण हा पूर्णविराम आहे कि स्वल्पविराम आहे, हे अजुन कळत नाही. मात्र अजित पवारांनी भाजप शिवसेनेची विचारधारा स्विकारली तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील असं म्हणत राज्यातल्या सत्तासंघर्षावर उदय सामंत भाष्य केलंय.

Published on: Apr 20, 2023 03:35 PM
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात भेट; पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…
मानाच्या कसबा गणपतीच्या भवताली हापूस आंब्यांची दरवळ, बघा आकर्षक सजावट