अख्ख्या महाराष्ट्राला समजलंय बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळू शकत नाही!; कुणाचा निशाणा

| Updated on: Apr 05, 2023 | 12:31 PM

Rohit Pawar on Bacchu Kadu : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आमदार बच्चू कडू आणि मंत्रिपदावर भाष्य केलंय. रोहित पवार नेमकं काय म्हणालेत? पाहा सविस्तर...

पुणे : राष्ट्रवादीचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आमदार बच्चू कडू आणि मंत्रिपदावर भाष्य केलंय. बच्चू कडू यांना स्वत:ला आणि अख्ख्या महाराष्ट्राला समजलं आहे की बच्चू कडूंना मंत्रिपद मिळू शकत नाही, असं रोहित पवार म्हणालेत. सरकारमधल्या अनेक लोकांना मंत्री व्हायचं आहे. शिंदे गटाच्या चाळीस लोकांचं मंत्री व्हायचं स्वप्न आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार लगेच होईल असं वाटत नाही. सरकारला त्यांच्या चाळीस लोकांना खुश ठेवायचा आहे. सरकार महाराष्ट्राचा विचार करत नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Published on: Apr 05, 2023 12:31 PM
ठाकरे-फडणवीस वादावर मनसे नेत्याची टीका; म्हणाले, स्थर घसरत…
ठाकरेगटाच्या महामोर्चाला पोलिसांची परवानगी, पण ‘हे’ नियम पाळावेच लागणार