“गौतमी पाटीलचा डान्स आणि इंदुरीकर महाराजांचं कीर्तन सांस्कृतिक चौकटीत बसत नाही”

| Updated on: Apr 13, 2023 | 1:15 PM

Sadanand More : गौतमी पाटीलचा डान्स आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची टीका. म्हणाले, दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज.

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेंची इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनावर आणि गौतमी पाटीलच्या डान्सवर टीका केली आहे. “दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवतात. गौतमीने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही महाराजांना नावं ठेवतात. दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे”, असं सदानंद मोरे म्हणाले आहेत. इंदुरीकर महाराज सामाजिक प्रश्न मांडतात ते चांगलं आहे. मात्र ते ज्या पध्दतीने मांडतात ते कीर्तनात बसत नाही. कीर्तनात विनोदरस नसतो. त्यामुळे कीर्तनातील बुजुर्ग मंडळी म्हणतात की हे कीर्तनात बसत नाही. गौतमी पाटीलचंही तसंच आहे. आपली एक सांस्कृतिक चौकट आहे त्या चौकटीत तिचा डान्स बसत नाही, असंही सदानंद मोरे म्हणाले आहेत.

Published on: Apr 13, 2023 01:15 PM
रोजगार मेळाव्यावरील विरोधकांच्या टीकेला नारायण राणेंच प्रत्युत्तर; म्हणाले, आता…
आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर नारायण राणेंची आगपाखड; म्हणाले, आता…