उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक कशासाठी? शरद पवार यांनी कारण सांगितलं…

| Updated on: Apr 12, 2023 | 12:20 PM

Sharad Pawar : उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?; शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. पाहा ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल संध्याकाळी बैठक झाली. ही बैठक नेमकी कशासाठी झाली? कोणते मुद्दे चर्चिले गेले यावर शरद पवार यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत. त्या सगळ्यांनी एका विचाराने काम करावं, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. त्या संदर्भात आम्हा दोघांमध्ये चर्चा झाली. काही कार्यक्रम आखलेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षांनी सहभागी व्हावं, अशी आमची भूमिका आहे. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली, असं शरद पवार म्हणाले. पुण्यात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे.

Published on: Apr 12, 2023 12:20 PM
Sanjay Raut : ‘सिल्व्हर ओक’ बैठकीवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
Sanjay Raut : बावनकुळेंच्या 184 आकड्याचा आणि राऊत यांच्या निर्मला वॉशिंग पावडर वक्तव्याचा संबंध काय?