दगडूशेठ गणपती मंदिरात 50 लाख सुवासिक फुलांची आरास

| Updated on: Apr 11, 2023 | 8:19 AM

Pune Dagdusheth Halwai Ganapati : दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन ; वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाचे आयोजन

पुणे : पुण्यातील दगडूशेठ गणपतीला आकर्षक आणि सुगंधी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तब्बल 50 लाख सुवासिक फुलांचा गंध मंदिर परिसरात दरवळत होता. मोग-याच्या सुवासिक फुलांसह गुलाब, लीली, चाफा, झेंडूच्या फुलांची आरास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त करण्यात आली. मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्यासोबतच हे दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. लाडक्या गणपती बाप्पाला फुलांचा महानैवेद्य दाखवण्यात आलं. तेव्हा मनमोहक दृश्य पुणेकरांना अनुभवायला मिळालं. गणरायाच्या मूर्तीला शुंडाभूषण, कानवले, मुकुट, अंगरखा यांसह फुलांनी साकारलेली विविध आभूषणे परिधान करण्यात आली होती. गणरायाचे मनोहारी रूप पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले होते. तब्बल 250 महिला आणि 70 पुरुष कारागीरांनी सलग 3 दिवस पुष्पसजावटीची तयारी केली होती.

Published on: Apr 11, 2023 08:15 AM
संजय राऊत यांचा कोर्टाला अर्ज, पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी; काय आहे प्रकरण?
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात एकता मिसळ महोत्सव; चंद्रकांत पाटील यांच्याकडून मिसळला फोडणी