तुम्ही मातोश्रीमुळे आमदार झाला, याची जाणीव ठेवा; ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं शिवसेना आमदारावर टीकास्त्र

| Updated on: Apr 25, 2023 | 8:15 AM

Shubhangi Patil on Kishor Patil Shivsena : शिवसेना आमदारावर ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं टीकास्त्र; पाहा व्हीडिओ...

पुणे : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही मातोश्री मुळेच आमदार झाले आहात. याच मातोश्रीमुळे तुम्हाला आमदारकी मिळाली आणि आता त्याच मातोश्रीवर बोलणं चुकीचं आहे, असं शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत. त्यांना फक्त हे दाखवायचं होत की मी किती काकांच्या विचारांसाठी निष्ठावान आहे. तुम्ही जर त्यांच्या विचारांशी निष्ठावान असतात तर गद्दारी केली नसती, असंही शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत. आमची मशाल पेटलेली आहे. या पेटलेल्या मशालीसमोर कोण टिकेल आणि कोण संपेल निवडणूक दाखवून देईल. 2024 ला ठाकरेंची शिवसेनाच जिंकणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना तुमच्यासोबत होती म्हणून तुम्ही जिंकत आलात येणाऱ्या 24 मध्ये आम्हीच जिंकू, असं म्हणत शुभांगी पाटील यांनी भाजप आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

Published on: Apr 25, 2023 08:15 AM
अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं झालं, हळद पिकाला बुरशी; शेतकरी पुन्हा हवालदिल
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० ते ६० प्रवाशांची बस उलटली अन्…