पुणे पोलिसांच्या कोयत्या गँगच्या मुळावरच घाव, जप्त केले तब्बल 105 कोयते

| Updated on: Jan 10, 2023 | 10:24 PM

पुण्यातील मुख् बाजारपेठ असलेल्या मोबाइल मार्केटमध्ये कोयता गँगकडून कालच दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे पोलीसांनी आपला मोर्चा कोयता गँगकडे वळत त्यांची दहशत मोडून काढण्याचे काम केलं आहे.

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली होती. शहरात अनेक ठिकाणी या गँगने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शहरातील अनेक भाग हा दहशतीखाली होता. त्यामुळे या गँगवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत होती.

पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोबाइल मार्केटमध्ये कोयता गँगकडून कालच दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे पोलीसांनी आपला मोर्चा कोयता गँगकडे वळत त्यांची दहशत मोडून काढण्याचे काम केलं आहे.

पुणे पोलिसांनी रविवार पेठेत कारवाई करत एकाला अटकही केली. तसेच त्याच्याकडून तब्बल १०५ कोयते जप्त केले आहेत. त्यामुळे पोलीसांनी कोयता गँगबरोबरच त्याच्या मुळावरच घाव घातला आहे.

Published on: Jan 10, 2023 10:24 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधान
संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर; भाजपकडून जोरदार तयारी