2024 ला कुणासोबत जाणार, युती की मविआ?; राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितलं…

| Updated on: Mar 28, 2023 | 2:27 PM

सत्ताधारी आणि विरोधकांचे सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. सध्या राजकराण खूप खालच्या स्तराला पोहचलंय. थकीत एफआरपी तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी यासाठी साखर आयुक्तांची भेट घेतली, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : लोकसभा निवडणुकीला काही महिने राहिलेले असताना राज्यात राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुढची भूमिका काय असणार, महाविकास आघाडीसोबत जाणार की युती करणार? याविषयी राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाविकास आघाडीचा अनुभव वाईट आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी आणि भाजप – शिवसेनासेना युतीसोबत जाणार नाही. लोकसभेच्या 6 जागा या स्वबळावर लढणार आणि इतर 42 जागा समविचारी लोकांसोबत जाणार आहोत, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.चंद्रशेखर राव यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्यांच्या सभेला यापुढे जर प्रतिसाद वाढला तर नवल वाटायला नको, असंही ते म्हणाले आहेत.

Published on: Mar 28, 2023 02:23 PM
राहुल गांधी यांना अंदमानची तिकीटं कुणी आणि का पाठवली?; पाहा…
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा कधी आणि कुठे असणार?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं…