पुणेकर अडकले कुठे?; देशात कशात लागला सहावा क्रमांक

| Updated on: Apr 30, 2023 | 3:36 PM

जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत.

पुणे : पुणेकरांसह येथे येणाऱ्यांसाठी पुण्यातील वाहतूक कोंडी (Traffic Problems) ही मोठी समस्या बनली आहे. येथील वाहतूक कोंडिची दखल आता जागतिक स्तरावर झाली आहे. जागतिक वाहतूक कोंडीत पुणे (Pune) जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत. येत्या काही दिवसांत पुण्यात वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशासह जगभरातील मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे एका खाजगी संस्थेनं केला आहे. टॉम टॉम या (Tom Tom survey) कंपनीनं वाहतूक कोंडीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. ज्यात बंगळुरू आणि पुण्याचा समावेश आहे. या अहवालानुसार बंगळुरू जगात दुसऱ्याया क्रमांकावर, पुणे सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या अहवालानुसार, पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याचे आणि वाहतूक कोंडीचे चित्र स्पष्ट होत आहे.

Published on: Apr 30, 2023 03:36 PM
राऊत-अंधारे यांचे नाव घेत, आम्ही काही रिकामटेकडे नाही म्हणत शिवसेनेच्या नेत्याची सडकून टीका
“राष्ट्रवादी किती वेळा भावी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणणार, त्यापेक्षा लोकांची काम करा”