महाविकास आघाडीच्या सभेनं काही फरक पडणार नाही! आम्ही पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ; भाजपच्या ‘या’ नेत्याला विश्वास

| Updated on: Apr 01, 2023 | 3:26 PM

महाविकास आघाडीची उद्या सभा होतेय. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

पुणे : उद्या महाविकास आघाडीची सभा होतेय. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठवाड्यात उद्याच्या महाविकास आघाडीच्या सभेनं काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि भाजप पुन्हा पूर्ण बहुमताने निवडून येणार”, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय. या आधीही त्यांच्या सभा झाल्या मात्र काही फरक पडला नाही. आताही काहीही फरक पडणार नाही. खरी गद्दारी ही 2019 मध्ये झाली. आम्हाला ही बोलता येतं. त्यामुळे अजित पवारांनी तर गद्दारी बद्दल बोलूच नये. पहाटेच्या शपथविधी वेळी काय झालं? भाजप आणि शिवसेनेला जनतेनं कौल दिलेला असताना शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेली. खरी गद्दारी तेव्हा झाली, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

मुंबईच्या समुद्रामध्ये पुन्हा एकदा संशयास्पद बोट; यावेळी दोन पाकिस्तानी नागरिक
संयोगिताराजे प्रकरणानंतर स्वराज्य संघटना आक्रमक, काय केली मागणी?