गल्लीत बसलेली पोरं काहीतरी करतात!; संजय राऊतांच्या धमकी प्रकरणावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची प्रतिक्रिया
खासदार संजय राऊतांच्या धमकी प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
पुणे : “अशा धमक्या नितीन गडकरींनाही आल्या अमित शहांनाही आल्या आहेत. त्याच्याकडे कुठून आली AK 47? गल्लीत बसलेली पोरं असं काहीतरी करतात. पोलीस तपास करतील त्याचा काही संबंध कोणत्या संघटनेशी आहे का ते”, असं म्हणत संजय राऊतांच्या धमकी प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठवाड्यात उद्याच्या महाविकास आघाडीच्या सभेने काही फरक पडणार नाही. आम्ही शिवसेना आणि भाजप पूर्ण बहुमत मिळवू. या आधीही त्यांच्या सभा झाल्या मात्र काही फरक पडला नाही आताही पडणार नाही, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते.
Published on: Apr 01, 2023 02:49 PM