हरियाणाच्या सोमवीरला आस्मान दाखवत अभिजीत कटकेने खेचून आणला हिंदकेसरी किताब
पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोमवीरला आस्मान दाखवू हिंदकेसरी किताब आपल्या नावावर केला. या मानाच्या स्पर्धेची मानाची गदा कटके याने पटकावली आहे.
पुणे : भारतीय शैली कुस्ती महासंघाने आयोजित अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. ही दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा झाली. पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याला अस्मान दाखवले आणि अख्या महाराष्ट्रात एकच जल्लोष पहायला मिळत आहे.
पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोमवीरला आस्मान दाखवू हिंदकेसरी किताब आपल्या नावावर केला. या मानाच्या स्पर्धेची मानाची गदा कटके याने पटकावली आहे. त्याच्या या विजयाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याच्या आधी देखिल अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी होण्याचा मानही मिळवला होता. तो आता हिंदकेसरी झाला. यानंतर त्याने आनंद व्यक्त करताना, याच्या आधी मी हिंदकेसरीसाठी प्रयत्न केला होता. तेव्हा मी हारलो होतो. पण आज हे पद आणि मानाची गदा आपल्याकडे आल्याने मी खूप खूश आहे अशा भावना कटके यांनी व्यक्त केल्या.