राज्यात दंगल घडणार हे राज ठाकरे यांनी आधीचं सांगितलं होतं!; ‘या’ नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Apr 01, 2023 | 10:28 AM

Yogesh Khaire on Raj Thackeray : राज्यात दंगल घडणार हे आधीचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं , असं मनसेच्या नेत्याने म्हटलं आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला. त्यावर मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात दंगल घडणार हे आधीचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं , असं योगेश खैरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे बोलले होते. त्या पद्धतीने या गोष्टी घडतायेत. केंद्र सरकारने शहराचं नामांतर केल्यानंतर इम्तियाज जलीलांनी आंदोलन करण्याची गरज नव्हती. लोकांना भडकवलं त्यातून या गोष्टी घडत गेल्या. इम्तियाज जलीलसारख्या लोकांना हे करण्याची अजिबात गरज नव्हती. मात्र आंदोलनातून भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दंगलीमागचं हे सुद्धा एक कारण असू शकतं, असा आरोप योगेश खैरेंनी एमआयएमवर केला आहे.

Published on: Apr 01, 2023 10:13 AM
उद्या माहिती पडेल कॉमेडी सभा आहे की जनमानसची?; शिरसाट यांच्या टीकेला काँग्रेच्या नेत्याचं उत्तर
तुम्ही वाटच बघत होतात का? आव्हाडांचा भाजपला खोचक सवाल