मेट्रोमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचा मोठ्या उत्साहात प्रवास

| Updated on: Mar 07, 2022 | 11:10 AM

पहिल्याच दिवशी वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 21 हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला.

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन दुपारनंतर मेट्रोचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी ( citizens)खुला करण्यात आला आहे.  पहिल्याच दिवशी वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 21 हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. नागरिकांनी केलया प्रवासातून मेट्रोला पाच लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अनेक नागरिकांनी सहकुटुंब , तरुणांनी मित्रमैत्रिणींच्या सोबत प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटूला. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन) लिमिटेडकडून पुण्यात महामेट्रोच्या (Mahametro) एकूण 32 किलोमीटरच्या मार्गापैकी12 किलोमीटरच्या मार्गावर काल पासून मेट्रो सुरु झाली.

Published on: Mar 07, 2022 11:10 AM
अमरावती जिल्ह्यातील कांडली गावचे उपसरपंच गंगा धंडारेयांच्यावर प्राणघातक हल्ला
नालासोपाऱ्यात कौटुंबिक वादातून फायरिंग