औरंगाबादच्या सेवन हिल परिसरातील पेट्रोल पंपावर दोन गटांमध्ये राडा
गेल्या काही दिवसांत औरंगाबादेत मारहाणीच्या (Aurangabad Crime News) घटना वाढल्यात. आता तर क्षुल्लक कारणावरुन पेट्रोल पंपावर तुफान राडा झाल्याचं वृत्त आहे. औरंगाबादच्या सेवन हिल परिसरात पेट्रोल पंपावर तुफान राडा (Petrol pump Fight) झाला. दोन गटात यावेळी फ्रीस्टाईल हाणामारी झाली
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत औरंगाबादेत मारहाणीच्या (Aurangabad Crime News) घटना वाढल्यात. आता तर क्षुल्लक कारणावरुन पेट्रोल पंपावर तुफान राडा झाल्याचं वृत्त आहे. औरंगाबादच्या सेवन हिल परिसरात पेट्रोल पंपावर तुफान राडा (Petrol pump Fight) झाला. दोन गटात यावेळी फ्रीस्टाईल हाणामारी झाली. पेट्रोल पंपावर गाडी पुढे घेण्याचा सुरुवातीला वाद झाला. वाद विकोपाला गेला. दोन गटांत आधी बाचाबाची झाली. त्यानंतर एकमेकांवर हात उगारले गेले आणि मग वाद आणखीनच पेटला. पेट्रोल पंपवर यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीहीह गंभीर जखल घेतली आहे. एकूण सहा ते सात तरुणांना पोलिसांनी (Aurangabad Police) ताब्यात घेतलंय.