Radhakrishna Vikhe : राहुल गांधींनी ‘काँग्रेस छोडो’ कार्यक्रमाची चिंता करावी, राधाकृष्ण विखेंनी ‘काँग्रेस जोडो’ची उडवली खिल्ली

| Updated on: Sep 08, 2022 | 5:06 PM

मागच्या सरकारसारखे आम्ही माझे कुटुंब तुमची जबाबदारी यासारखे वागणार नाही, अशी टीका राधाकृष्ण विखेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

जळगाव : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडो जो कार्यक्रम सुरू आहे, त्याची चिंता करायला हवी, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेची उडवली खिल्ली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज जनावरांवरील लम्पी स्किन आजाराच्या पाहणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले, त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर (Congress)  टीका केली. सत्ता गेल्याचे वैफल्य काही लोकांना आले आहे. त्यामुळे ते वैफल्यातून राज्य सरकारवर टीका करत आहेत. त्यांच्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही. प्रत्येक विरोधकाच्या (Opposition) टीकेला उत्तर दिले पाहिजे, असे काही नाही. राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करत आहे, चांगले निर्णय घेत आहे. सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेतली आहे. मागच्या सरकारसारखे आम्ही माझे कुटुंब तुमची जबाबदारी यासारखे वागणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
Published on: Sep 08, 2022 05:06 PM
Dhananjay Munde : हे दळभद्री सरकार जास्त दिवस टिकणार नाही अन् लोकसभेचं त्यांचं स्वप्नही पूर्ण होणार नाही, मुंडेंचा टोला
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज