अशोकजी, काँग्रेसमध्ये आता काही उरलेलं नाही, त्यामुळे भाजपत या!; भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा दावा
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांना सल्ला दिला आहे. त्यांनी काय म्हटलंय पाहा...
मुंबई : भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांना सल्ला दिला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये काही राहिलेले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी देखील आता विचार करायला हवा. अशोक चव्हाण ज्या काँग्रेस पक्षाचे भविष्य काय आहे? अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहे. जगाने मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे त्यामुळे त्यांनी देखिल विचार करायला हवा, असं विखे पाटील म्हणालेत. मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Feb 16, 2023 03:36 PM