जयंत पाटील भाजपमध्ये आले तर? राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानानं चर्चांना उधाण

| Updated on: Aug 08, 2023 | 10:30 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु या वावड्या होत्या, असं सांगून चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सध्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु या वावड्या होत्या, असं सांगून चर्चांना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “त्या पक्षात एकटं पडल्यासारख त्यांना वाटतंय, राजकारणात Anything is possible.. भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, पक्ष विस्तार होतोय अजितदादा पण आले.त्यांचा एकदा निर्णय होऊ द्या मग त्यांच्या अनुभवाचा विचार करू.” राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Aug 08, 2023 10:30 AM
नितीन देसाई यांच्या प्रकरणात मोठी अपडेट, एडलवाईस कंपनीच्या चेअरमनची न्यायालयात धाव
नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता, व्यावसायिक कामानिमित्त गेल्या अन्…