वज्रमूठ बांधलीय खरी, पण तीच वज्रमूठ एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये म्हणजे झालं!; भाजपच्या नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Apr 03, 2023 | 7:33 AM

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूल मंत्र्यांनी टीका केली आहे.

पुणे : काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्ष घरात बसले. लोकांनी त्यांना फक्त फेसबुकवर पाहिलं. आता मात्र वज्रमूठ बांधली आहे. बांधलेली वज्रमूठ त्यांना एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये, असं म्हणत विखे पाटील यांनी महविकास आघाडीच्या सभेवर टीका केली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 03, 2023 07:33 AM
त्यावेळी काका आणि आका होते… का नाही विचारलं; भाजप नेत्याचा अजित पवारांना टोला
भाजपच्या जनआक्रोश मोर्चावरून उद्धव ठाकरे यांचा घनाघात